संपादकीय
आजचा सुधारक चा पाण्यावरचा हा विशेषांक वाचकांपुढे ठेवताना मी जरा बेचैन झालो आहे. पाणी हा विषय इतका मोठा आणि आपल्या जिव्हाळ्याचा आहे की एकट्यादुकट्या माणसाने त्याला न्याय देणे अवघड आहे. तरीदेखील हे धारिष्ट्य आसु वरील प्रेमापोटी आणि वाचकांच्या उदारपणावर विश्वास ठेवून करत आहे. पाणी हा पदार्थ मोठा विचित्र आहे. घन, द्रव आणि वायुरूप (बर्फ, पाणी, …